दहावीनंतर आपल्या आवडीनुसार कोणती शाखा निवडावी? कोणत्या शाखेतून करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखांशिवाय कोणते पर्याय समोर ठेवता येतील? असे अनेक प्रश्न सध्या अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार यांनी एकत्रितपणे सेमिनारचे आयोजन केले आहे. या मध्ये करिअर कौन्सिलर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा दाखवण्यासाठी मार्गदर्शन करतील.