मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

इतर महत्वाचे

पृथ्वीवरील पाणी प्रमाण:
* 71% पाणी आणि 29% जमीन आहे.
71% पाण्यापैकी 97% खारे पाणी, 2% बर्फ आणि 1% गोड पाणी (पिण्याजोगे) आहे.

* प्राकृतिक भारत:

  1. पर्वतीय प्रदेश : 10% (10.7)
  2. डोंगर : 18.6%
  3. पथारी प्रदेश : 27.7%
  4. मैदानी प्रदेश : 43.0%

मित्रानो, आपल्याला अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे माहित नसतात. अशा काही व्यक्तीची संपूर्ण नावे तुमच्या माहितीसाठी...

  • संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले
  • संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर
  • संत ज्ञानेश्वर - ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
  • गाडगे महाराज - डेबुजी झिग्राजी जानोरकर
  • समर्थ रामदास - नारायण सूर्याजी ठोसार
  • राजश्री शाहू महाराज - यशवंत आबासाहेब घाटगे
  • स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्ता
  • दादासाहे फाळके - धुदिराम गोविंद फाळके
  • व्ही.शांताराम - शांताराम राजाराम वानकुंद्रे
-----------------------------------------

संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न
* सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.
* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.
* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.
* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.
* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.
* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता- ७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.
* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.
संरक्षणविषयक घडामोडी
* सध्या भारताशी संरक्षण सामग्रीच्या विक्रीबाबत इस्राइल देश आघाडीवर आहे.
* २००९ मध्ये भारत सरकारने इजिप्त देशाशी गुन्हेगार हस्तांतरण करार केला.
* सेजील या अग्नीबाणाची चाचणी इराण देशाने घेतली.
* २००९ मध्ये चाचणी घेतलेले ‘शौर्य’ भारताचे क्षेपणास्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.
* जानेवारी २००९ मध्ये भारत व रशियादरम्यान पार पडलेल्या नौदल कवायती- इंद्र.
* ‘बैकानूर’ हे अवकाश प्रक्षेपण स्थळ कझाकिस्तान देशात आहे.
* जहाजविरोधी क्षेपणास्त्र ‘हार्पून-२’ हे भारताला अमेरिका देशाकडून मिळणार आहे.
* भारताने ‘गोर्शकोव्ह’ ही युद्धनौका रशिया देशाकडून खरेदी केली.
* भारत व फ्रान्स संयुक्तपणे विकसित करीत असलेले क्षेपणास्त्र- मित्र.
अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी
* चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते.
* स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली.
* जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश- डेन्मार्क.
* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.
* अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.
* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा.
* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.
* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश.
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.
* युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.
क्रीडाविषयक घडामोडी
* ‘बटरफ्लाय’ हा प्रकार जलतरण खेळाशी संबंधित आहे.
* ‘डकवर्थ लुईस नियम’ क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
* ‘तरुणदीप राय’ हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे.
* क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य- महाराष्ट्र.
* २०१० ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा- दक्षिण आफ्रिका.
* ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
* बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय- अभिनव बिंद्रा.
* चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
महत्त्वाचे दिवस
* २३ मार्च- जागतिक हवामान दिन * १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन * २४ मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन * ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन * १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन * १५ मार्च- जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च- जागतिक वन दिन * ५ जून- जागतिक पर्यावरण दिवस * २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन * ६ जानेवारी- पत्रकार दिवस * ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन * २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका दिन * २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस
महत्त्वाची समिती व आयोग
* सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली.
* राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
* गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती- फतेचंद बन्सल समिती.
* नर्सरी शाळेतील प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी- अशोक गांगुली समिती.
* अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी- राजेंद्र सच्चर समिती.
* भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती- नरेशचंद्रा समिती.

महत्त्वाची पुस्तके
* एन्ड ऑफ हिस्ट्री- फ्रान्सिस फुकुयामा
* ए ट्रेन टू पाकिस्तान- खुशवंत सिंग
* ए मिशन इन काश्मीर- नमिता देवीदयाल
* डॉटर ऑफ द ईस्ट- बेनझीर भुट्टो
* ए लॉग वॉक टू फ्रिडम- नेल्सन मंडेला
* विंग्स ऑफ फायर- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
० २०१० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोची केरळ येथे पार पडणार आहे.
० २०१० मध्ये विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारत (नवी दिल्ली)
० जागतिक युवा व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. विजेता संघ : ब्राझील, उपविजेता : क्युबा
० २००९ फ्रेंच ओपन टेनिस : रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवा
० आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष : लिअ‍ॅद्रो नेग्री
० आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष : जोसेफ ब्लॅटेर
० रोम येथे पार पडलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत चीनच्या झाओजिंगने विश्वविक्रम केला.
० संदीप शेजवळ व वीरधवल खाडे भारताचे जलतरणपटू आहेत.
० सोमदेव देववर्मन हा खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० सुदीरमन करंडक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
० नेहरू करंडक फुटबॉल खेळाशी संबंधित आहे.
० अझलन शहा कप हॉकी खेळाशी संबंधित आहे.
० सानामाचा चानू व प्रतिमा कुमारी वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित आहे.
० सायकलिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीत स्पेनचा अल्बर्ट कोन्टाडोर याने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.
० शरथ कमल टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे.
० चवथ्या जागतिक मिलिटरी स्पर्धा (२००७) हैदराबाद येथे पार पडल्या.
० देवधर चषक, दुलिप करंडक, इराणी चषक, रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
० ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदक पटकावले.
संरक्षणविषयक
० भारतीय नौसेनेची संपूर्ण विश्वभर भ्रमण करणारी बोट : आयएनएस तरंगिनी.
० भारताच्या ‘अग्नी १’ या समकक्ष पाकिस्तानचे क्षेपणास्त्र : घौरी
० भारताचे पहिले वैमानिकरहित विमान : लक्ष्य
० जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र : पृथ्वी, अग्नी, नाग
० जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र : आकाश, त्रिशूल, ब्राह्मोस
० ध्वनीच्या तिप्पट वेगाने २९० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणारे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपमे विकसित केलेले ‘ब्राह्मोस’ हे सुपरसोनिक जहाजभेदी क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
० अमेरिकन बनावटीची वैमानिक विरहित विमाने : चकोर
० सूर्य हे ५००० कि.मी. पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.
० भारतीय हवाई दलात महिला वैमानिकांचा समावेश : १७ डिसेंबर, १९९४ पासून.
अर्थ व वाणिज्यविषयक
० भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार अमेरिका देशाशी आहे.
० भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा देश : मॉरिशस, दुसरा-अमेरिका, तिसरा-जपान
० जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था : चीन, दुसरा-भारत.
* भारतात दारिद्रय़ रेषेखालील लोकांचे सर्वाधिक प्रमाण : ओरिसा (४६.४०टक्के)
० भारतात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य : महाराष्ट्र
० मंदी आणि आर्थिक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करण्याचा भारताचा जगात ऑस्ट्रेलिया, चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.
शैक्षणिकविषयक व आरोग्यविषयक
० भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा : मल्लापुरम (केरळ)
० भारतीय संशोधकांनी म्हशीचे जगातील दुसरे क्लोन तयार केले असून ‘गरिमा’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पहिले क्लोन ‘गौरी’ याच संशोधकांनी निर्माण केले होते.
० स्वाईन फ्ल्यू हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या H1N1 या विषाणूमुळे होतो. मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण २१ एप्रिल, २००९ रोजी आढळला. H1N1 हा विषाणू इवसन संस्थेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो.
० मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
इतर प्रश्न
० भारताची १०१ वी घटना दुरुस्ती जीवनावश्यक वस्तूंबाबत असून १०३वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याबाबत आहे.
० राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना : २३ फेब्रुवारी, २००७.
० भारत-पाक रेल्वे सेवा : समझोता एक्स्प्रेस
० भारत-पाक बस सेवा : साद-ए-सरहद, कारवाँ-ए-अमन
० भारत-बांग्लादेश रेल्वे सेवा : मैत्री एक्स्प्रेस
० विविध आयोग व समिती:
० बाबरी मशीद प्रकरण : लिबरहान आयोग
० गोध्रा हत्याकांड : नानावटी आयोग
० निवडणूक सुधारणाविषयक समिती : व्ही. एम. तारकुंडे समिती
० मतदारसंघ पुनर्रचना आयोग : न्या. कुलदीप सिंह
० महत्त्वाची योजना:
० मांगल्यसूत्र योजना : ही योजना अल्पदराची योजना असून केरळ राज्यामध्ये मुलीच्या लग्नामुळे तिच्या वडिलांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारने राबविलेली योजना.


हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांना येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.


यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचाजन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ. स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ. स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीने केला. इ. स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
[संपादन] गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
शिव मंदीर

* शिवाई देवी मंदिर-

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणार्‍या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.

* अंबरखाना-

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणार्‍या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

* पाण्याची टाकी-

वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

* शिवकुंज -

हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

* शिवजन्मस्थान इमारत-
शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.

* कडेलोट कडा-

येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.