मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

भारत

अपूर्ण :

ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून ‘भारत’ तर आर्यवंशीय लोकांच्या भूमीवरून ‘आर्यावर्त’ आणि ‘सिंधुनदीमुळे’ हिंदुस्थान अशा नावांचा उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द ‘सिंधू’पासून तयार झालेल्या ‘इंडिया’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली.
० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे.
० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे.
० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (२.४२ टक्के) क्रमांक लागतो.
० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे.
० भारताची दक्षिणोत्तर लांबी-३,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे.
० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत.
० भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची एकूण लांबी- ६,१०० कि.मी. आहे.
० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे.
० सन २००१च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या- १०२ कोटी ८७ लाख ३७,४३६
० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे.
० २००१च्या नुसार लोकसंख्येची घनता- ३२४ व्यक्ती प्रति चौ.कि.मी.
० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश
० भारतात पुरुष-स्त्री प्रमाण- १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया
० सर्वाधिक स्त्री प्रमाण असलेले राज्य- केरळ (१०५८ स्त्रिया)
० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे.
० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम
० २००१च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८% आहे.
० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार
० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर)
० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी)
० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.
० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे.
० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर.
० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून.
० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची
० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली.
० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे.
० डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे.
० रॅडक्लिफ रेषा-भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आहे.
० भारताच्या उत्तर-पूर्वेकडील ईशान्य भागातील राज्यांना ‘सेव्हन सिस्टर अर्स’ म्हणतात.
सेव्हन सिस्टर :
१) अरुणाचल प्रदेश- इटानगर (राजधानी) २) नागालँड-कोहिमा
३) मेघालय-शिलाँग ४) मिझोराम-ऐझवॉल ५) आसाम-दिसपूर
६) त्रिपुरा-आगरताळा ७) सिक्कीम-गंगटोक
० अरुणाचल प्रदेश भारताचे चोविसावे राज्य आहे तर गोवा पंचविसावे राज्य आहे.
० आसाम राज्याची सीमा भूतान व बांगलादेश या दोन देशांना भिडली आहे.
० सिक्कीम राज्याची सीमा नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांना संलग्न आहे.
० मिझोराम राज्याची सीमा म्यानमार व बांगलादेश या दोन देशांना संलग्न आहे.
० भारतातील अतिपूर्वेकडील राज्य-अरुणाचल प्रदेश
० भारतातील सर्वात मोठी ‘आदिवासी’ जमात-संथाल
आदिवासी जमाती व प्रदेश
१) गारवो, खासी-आसाम, मेघालय, नागालँड २) हो. छोटा नागपूर
३) तोडा-निलगिरी पर्वत (तामिळनाडू) ४) वारली, भिल्ल-महाराष्ट्र
५) गोंड, कोलाम-मध्य प्रदेश
० अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन रांग आहे.
० पश्चिम घाटाला सह्य़ाद्री म्हणून ओळखले जाते.
० ‘‘गुरुशिखर’’ हे अरवली पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे.
० ‘‘दोडाबेट्टा’’ हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
० ‘पंचमढी’ हे सातपुडा पर्वतरांगेत सर्वाधिक
उंचीचे ठिकाण आहे.
थंड हवेची ठिकाणे
१) महाराष्ट्र-चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, तोरणमळ, पाचगणी
२) हिमाचल प्रदेश-डलहौसी, सिमला, कुलू-मनाली
३) उत्तरांचल-मसुरी, नैनिताल
४) तामिळनाडू-कोडाईकॅनॉल
५) प.बंगाल-दार्जिलिंग, सिलीगुडी
६) राजस्थान-माऊंट अबू
० कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात उंच व मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
० कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
० पेंच राष्ट्रीय उद्यान ‘प्रियदर्शिनी-इंदिरा गांधी’ नावाने ओळखले जाते.
० महाराष्ट्रात एकूण ३३ अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास १४ मे २००४ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे.
० भारतात एकूण ३८ व्याघ्र प्रकल्प आहे. (३८वा व्याघ्र प्रकल्प-परंबीकुलम अभयारण्य-केरळ)
० भारतात दर चार वर्षांनी वाघांची गणना होते.
० २००७-०८च्या आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६४% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात सध्या २०.१७ क्षेत्र वनक्षेत्र आहे.
० चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन-कर्नाटक
० सध्या बहुचर्चित तिहरी प्रकल्प उत्तरांचल राज्यात ‘भागीरथी’ नदीवर विकसित होत आहे. या प्रकल्पाला रशिया या देशाने मदत केली आहे.
० भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर-वुलर सरोवर
० भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर-सांबर सरोवर
० जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर-अजमेर (राजस्थान) येथे आहे.
० भारतात स्थलांतरीत होतीस ‘झूमिंग’ म्हणतात.
० भारताचे नंदनवन म्हणून ‘काश्मिर’ ओळखले जाते.
० ‘रॉयलसीमा’ हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात आहे.
० चंदिगड हे भारतातील पहिले सुनियोजित शहर आहे.
० भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून ‘चंदिगड’ ओळखले जाते.
० ली कार्बुझियर यांनी चंदीगड शहराची रचना केली.
० भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला.
शहरे व त्यांची टोपणनावे :
१) हैद्राबाद-हायटेक सिटी २) बंगलोर-इलेक्ट्रॉनिक शहर
३) कोलकाता-राजवाडय़ांचे शहर ४) बनारस-मंदिराचे माहेरघर
५) जयपूर-गुलाबी शहर ६) मुंबई-सात बेटांचे शहर
७) अमृतसर-सुवर्ण मंदिराचे शहर ८) नाशिक-यात्रेकरूंचे शहर
० प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा येथे आहे.
० प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर मदुराई-तामिळनाडू येथे आहे.
० प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा येथे आहे.
० श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा-उत्तर प्रदेश राज्यात आहे.
० केंद्र सरकारने गंगा नदीला ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून जाहीर केले.