मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

तीव्र स्पर्धेत नेमके वाचाल तरच टिकाल


                करिअरकडे घेऊन जाणारी पहिली पायरी म्हणजे स्पर्धा परीक्षा. महाविद्यालयीन शिक्षणानंतर आता प्रतयेक जण स्पर्धा परीक्षाकंडे वळतो आहे. किंबहूना शिक्षण सुरू असतानाच काही जण याची तयारी सुरू करतात. स्पर्धा परीक्षांतील यशवंताच्या यशात ८० ते ९० टक्के वाटा असतो, तो पुस्तकांचा!

             स्पर्धा परीक्षांचे विश्व तसे खूपच विशाल, बरे, या परीक्षांत महाविद्यालयीन परीक्षाप्रमाणे निव्वळ पाट्या टाकून जमत नाही. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा, प्रश्नपत्रिकांचे स्वरूपही वेगळे. वस्तूनिष्ठ (objective) स्वरूपाच्या परीक्षांसाठी आवश्यकता आहे ती अचुकतेची. वर्णनात्मक (subjective) स्वरूपाच्या परीक्षांसाठी गरज असते ती नेमक्या ज्ञानाची. ही अचुकता आणि ज्ञान प्राप्त होते ते विविध पुस्तकांच्या वाचनातून. स्पर्धा परीक्षांत यशासाठी आवश्यक असतो तो त्या-त्या विषयांचा ‘बेसिक’ अभ्यास. 

              तुमच्या ‘बेसिक कन्सेप्टस्’ जेवढ्या ‘क्लिअर’ तेवढे तुमच यश हमखास. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात जवळपास सर्वच विषयांचा समावेश असतो. सर्वच विषयांत सारखी गती राखायची असेल, तर पुस्तकांसारखा दुसरा मार्गदर्शक नाही. बरे, हा विषय किचकट, तो चॅप्टर क्लिष्ट  असे म्हणून ते टाळूनही पुढेही जाता येत नाही. अशावेळी नेमके काय करावे, याचा  मार्ग सापडतो तो पुस्तकांतच. 

                यशाचे शिखर गाठण्यासाठी योग्य पुस्तकांचा ‘रोप वे’ तुमच्या हाती असेल तर मागे वळून पाहण्याची गरज राहणार नाही. एमपीएससी, युपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमीशन, रेल्वे भरती बोर्ड, बँका व जिल्हास्तरीय निवड समिती यासाठी परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असते. तरी, मूळ विषय सर्वत्र सारखेच आहेत. यासाठी आवश्यक आहे, नेमक्या पुस्ताकांचे वाचन विविध स्पर्धा परीक्षांतील इतिहास, भूगोल तसेच विज्ञान या विषयाच्या अभ्यासासाठी एनसीईआरटीची कृत्रिम पुस्तके संग्रही असलीच पाहिजेत. स्टेट बोर्ड बोर्डाच्या इयत्ता पाचती ते दहावीच्या पुस्तकांचे वाचन एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त करून देते. एमपीएससीच्या राज्यसेवा तसेच पीएसआय, एसटीआय व तत्सम परीक्षांसाठी या पुस्तकांचे वाचन तुम्हाला हमखास व हक्काचे गुण मिळवून देईल.

                      जनरल नॉलेजसाठी नेमके काय वाचावे? हा यक्षप्रश्न सर्वांसमोर असतो. वर्षभरातील घडामोडींवर आधारित मनोरमा इयर बुक, सीएसआर इयर बुक या पुस्तकांचे वाचन  तर हवेच. केंद्र सरकारचे ‘इंडिया,’इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया ही पुस्तके आवर्जून संग्रही असावीत. विश्वासार्ह माहितीसाठी महाराष्टÑ शासनाचे ‘लोकराज्य’ व केंद्र सरकारचे ‘योजना’व कुरुक्षेत्र ही मासिके वाचणे अगदी ‘ मस्ट’ ! शासनाचे निर्णय, विविध शासकीय योजना, मंत्रिमंडाळाचे निर्णय, विशिष्ट बाबींसाठीचे शासकीय धोरण, ऐतिकासिक, राजकीय,आर्थिक, समाजिक व सांस्कृतिक संदर्भ, शासकीय पुरस्कार आदी माहितीसाठी ‘लोकराज्य, योजना,कुरुक्षेत्र ’ या मासिकांना तोड नाही. कृषी घटकासाठी शासनाच्या शेतकरी मासिकातून अचूक व नेमकी माहिती मिळते. या शिवाय राज्यतीत कृषी विद्यापीठांतर्फे दरवर्षी वार्षिक दैनदिनी (डायरी) प्रकाशित करण्यात येतात. या डाय-यांमध्ये अत्यंत चांगली माहिती असते. या डाय-याच्या वाचनाने ‘कृषी’ घटक अधिक सोपा होईल.

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी प्रचंड वाचन, आकलन, मनन यांची तयारी ठेवणे आवश्यक आहे. 

                   प्रचंड स्पर्धत एखाद्या गुणांमुळे तुमची ‘रँक’ शेकडोंनी खाली घसरू शकते. निगेटीव्ह मार्किंग मध्ये अचुकता म्हत्त्वाची, ही अचुकता व परिपूर्णता मिळवायची असेल तर ‘नेमके वाचाल तरच टिकाल’ हे नेहमी लक्षात ठेवा !

नेहमी वाचा - यश मिळवा

स्पर्धा परीक्षातील यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारी काही निवडक पुस्तके अशी :

अर्थशास्त्र

* एनसीईआरटीचे इंडियन इकॉनॉमी फॉर मेन्स,

* इंडियन इकानॉमी :- दत्त- सुंदरम

* इंडियन इकॉनॉमी :- मिश्रा -पुरी

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तके

* वृत्तपत्रातील अर्थविषयक पुरवण्या

इतिहास

* स्टेट बोर्डाची  इयत्ता ५ते १० वीची क्रमिक पुस्तके.

* एनसीईआरटीचे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व आधूनिक भारत.

* य.च.मु. विद्यापीठाची बी.ए.ची पुस्तके

विज्ञान

* स्टेट बोर्ड व एनसीईआरटीची इयत्ता ५ वी ते १२ वी ची पुस्तके

* टाटा मॅकग्रा हिल गाइड,

* विविध वृत्तपत्रांतील ‘सायन्स-टेक्नॉलॉजी’ विषयाच्या पुरवण्या

* य.च.मु. विद्यापीठाची पुस्तके

* मुंबई विद्यापीठाची पुस्तके

भूगोल

* एनसीईआरटी - इयत्ता ११ वी व १२ वीची पुस्तके

* स्टेट बोर्डाची इयत्ता ५ ते १० वीची पुस्तके

* य.च.मु. विद्यापीठाची पुस्तके

* ऑक्सफर्ड व इतर प्रकाशनाचे नकाशा विषयक पुस्तक

इतर / सर्वसाधारण : मुख्य गाइडस् ल्लयुनिक, टाटा मॅकग्रा हिल

* द इसेन्शियल गाईट टू करिअर्स इन इंडिया - उषा अल्बुकर्क

* क्लृप्त्या  आणि  सुत्रे

- पंढरीनाथ  नर्मदा प्रकाशन, मुंबई

भाषा     

* भाषिक कौशल्यांचा विकास : डॉ. चित्रा सोहनी (नित्य नुतन प्राकशन मुंबई)

* मराठी व्याकरण : मो.रा.वाळिंबे

* इंग्रजी व्याकरण : पाल अ‍ँड सुरी

* य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके

----------------------------------------------------------------
अजय कुलकर्णी | Aug 23, 2011, 22:47PM IST